आपली आवडती अॅप्स आपल्या Aptoide स्टोरमध्ये आणण्यासाठी Aptoide अपलोडर हे एक योग्य टूल आहे. आपल्या फोनवरील कोणतेही अॅप हे आपणांस पब्लिश करु देते, तेही सोपेपणाने, म्हणजे आपण आपल्या स्टोरमध्ये सर्व कंटेट कोणत्याही त्रासाशिवाय ठेऊ शकता!
हे अॅप आपल्याला आवश्यक सर्व फीचर्स, मल्टी अॅप अपलोड सह पुरविते! Aptoide अपलोडर बॅकग्राऊंडमध्ये काम करीत असल्याने, आपण एकाच वेळी पुष्कळशी अॅप्स पब्लिश करु शकता तेही आपला आवडता खेळ फोनवर खेळताना किंवा काम करताना किंवा आपल्या मित्रांशी चॅट करत असतानाच. जर आपण अपलोड करीत असलेल्या अॅपला वय दर किंवा अॅप श्रेणीसारखी माहिती हवी असेल, तर आपण ती माहिती अपलोड करीत असतानाच सम्मिलित करु शकाल आणि हव्या असलेल्या भाषेत वर्णनही जोडु शकता.
Aptoide वापरकर्त्यांसाठी हे अॅप बेसिक टूल आहे कारण आपल्या स्टोरमध्ये कंटेट अपलोड करण्याचा ह्यापेक्षा सोपा मार्ग नाही.
Aptoide अपलोडरसह आपल्या फोनवरील इंस्टॉल्ड अॅपची नविन आवृत्तीही आपल्या फोनवर आल्यानंतर आपल्या स्टोरमध्ये ऑटोमॅटिकली अपलोड करण्याची व्यवस्था करु शकता. ह्याप्रकारे आपण आपल्या Aptoide स्टोरमधील निवडलेले अॅप्स कायमच अपडेटेड असण्याची खात्री करु शकाल. ह्याव्यतिरिक्त, एएबी प्रकारच्या अॅपसाठीचे आमचे समर्थनही आता अधिक काळ चालणार आहे म्हणुन आता आपण पूर्वीपेक्षाही अधिक अॅप्स आपल्या स्टोरमध्ये अपलोड करु शकता.
Aptoide अपलोडर वापरणे अतिसोपे: जेव्हा आपण अॅप उघडाल, तेव्हा आपणास आपल्या फोनवर असलेली सर्व अॅप्स दिसतील, जे अपलोड करायचे आहे ते फक्त निवडा आणि "सबमिट अॅप्स" वर क्लिक करा. हव असलेल अॅप दिसण्यात समस्या येतेय? काळजीच नाही, आपण त्यांना तारखेप्रमाणे किंवा नावानेही सॉर्ट करु शकता!